मुदखेड ( ता. प्र.) मुदखेड ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपाय योजना केल्या जातात. ग...
मुदखेड ( ता. प्र.)
मुदखेड ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपाय योजना केल्या जातात. गरोदर मातांनी योग्य पोषण आहार घ्यावा, लसीकरण करावे, आपली काळजी घ्यावी, महिलांची प्रसूती जर योग्य झाली तर चिमुकल्या मुली सुदृढपणे बाहेर पडून समाजात सक्षमपणे उभ्या राहतील आरोग्य यंत्रणेने किशोरवयीन मुलीमधील आरोग्य विषयक न्यूनगंड वेळीच दूर करावा, यासाठी ग्रामीण भागातील महिलांमध्ये प्रभावीपणे आरोग्य विषयक जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भोकर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौ.अमिता चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात राज्य शासनाच्या आरोग्य विभाग, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. प्रारंभी धन्वंतरी देवीचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ. जयश्रीताई पावडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. मंगाराणीताई अंबुलगेकर, माजी महापौर मंगलाताई निमकर, रुग्णकल्याण समितीचे सदस्य डॉ. संदीप पचलिंग, पोलीस उपनिरीक्षक माधुरी यावलीकर, डॉ. रेखाताई चव्हाण, सौ अनिताताई इंगोले, माजी नगरसेविका सौ शांताबाई चव्हाण, सौ रंजनाताई बोकेफोड, सौ शितल चंद्रे , सौ सुरेखा पारवेकर ,सौ .लक्ष्मीबाई चमकुरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस केतकी चौधरी, तालुका अध्यक्ष सौ .जयश्री देशमुख ,शहराध्यक्ष दिपाली गोडसे ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान हा राज्य शासनाचा उपक्रम येथील ग्रामीण रुग्णालयात राबविण्यात येत आहे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सदर उपक्रम व महिलांनी आपल्या आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर भूमिका या निमित्ताने बोलताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप फुगारे यांनी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी केले तर आभार डॉक्टर आशिष तळणीकर यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS