लोहा / प्रतिनिधी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल झाल्यामुळे व्हायरस इन्फेक्शना बरोबरच किटक जन्य आजाराने डोकेवर काढले असल्...
लोहा / प्रतिनिधी
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल झाल्यामुळे व्हायरस इन्फेक्शना बरोबरच किटक जन्य आजाराने डोकेवर काढले असल्यामुळे लोहा न.पा. च्या वतीने शहरात धूर फवारणी ,अंबेटीग, गप्पी माशांचा वापर करून डासांचा नायनाट करण्यात येत तेव्हा नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा व न.पा. कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे.
मच्छर व डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू, चिकन गोनिया , हिवताप, मलेरिया हे आजार होऊ शकतात तेव्हा सार्वजनिक ठिकाणी मच्छर व डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी लोहा न.पा सर्वोतरी खबरदारी घेत आहे. लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, अभियंता चौडेकर, नळगे, राजकौर,दाढेल, धुतमल,आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
तेव्हा नागरिकांनी ही आपली जबाबदारी म्हणून घरात व अंगणात मच्छर,डास,होणार नाहीत याची काळजी घ्यावी डेंग्यू च्या डासा या स्वच्छ पाण्यात होतात तेव्हा आपल्या घरातील हौद, टाक्या, रांजण आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवावा त्यामध्ये डासांची उत्पत्ती व अंडी, आळी निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी , तसेच घरात मच्छर होऊ नये व चावू नये म्हणून धूर करावा,काईल, अगरबत्ती लावावी अंगावर पुर्ण कपडे घालावे तसेच लोहा न.पा.चे कर्मचारी कोरडा दिवस पाळण्यासाठी व आपल्या घरातील हौद , टाक्या तपासणी करण्यासाठी आल्यावर त्यांना सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे.

COMMENTS