नायगाव प्रतिनिधी : देगलूर तालुक्याहून नांदेड कडे प्रवासी घेऊन येणाऱ्या क्रुझरचा अचानक टायर फुटल्याने कुष्णूर जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्य...
नायगाव प्रतिनिधी :
देगलूर तालुक्याहून नांदेड कडे प्रवासी घेऊन येणाऱ्या क्रुझरचा अचानक टायर फुटल्याने कुष्णूर जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये दोन जाग्यावर ठार झाले असून आठ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे
अधिक वृत असे की देगलूर तालुक्यातील देगाव येथून क्रुझर जीप क्रमांक केएच.३२ एम.६४२३ या प्रवासी घेऊन नांदेडच्या दिशेने निघाली सदर गाडी भरधाव वेगाने चालत असल्याने नागाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुसनूर जवळ दि.१८ आॅगस्ट २०२२ रोजी दुपारी साडे चार च्या दरम्यान वाहनचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे कळते हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे मृत्युमुखी पडलेल्या मध्ये आमदबी शेख (वय ५० रा.देगाव), महबूब बाबू शेख (वय ४५ रा.गोजेगाव मुक्रामाबाद) असे आहेत अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी सदर ठिकाणाजवळ जाऊन जखमींना बाहेर काढले गंभीर जखमी असलेल्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले सदर घटनास्थळी कुंटूर चे पोलीस उपनिरीक्षक महादेव पुरी हे दाखल झाले असून अपघाताची पाहणी केली मयत हे एकाच कुंटुंबातील असल्याचे समजते तर क्रुझर गाडीचा टायर फुटल्यानमुळे चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे

COMMENTS