मुदखेड (ता. प्र.) देशसेवा ही आजी माजी सैनिकांच्या नसानसात भिणलेली आहे शासकीय स्तरावर सैनिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासक...
मुदखेड (ता. प्र.)
देशसेवा ही आजी माजी सैनिकांच्या नसानसात भिणलेली आहे शासकीय स्तरावर सैनिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आजी-माजी सैनिकांना सामाजिक जाणीव च्या भूमिकेतून सहकार्य करावे ,पुढील काळात कोणत्याही राष्ट्रीय सामाजिक कामासाठी शासकीय यंत्रणेला माजी सैनिकांची गरज भासल्यास विधायक कामासाठी प्रशासनास माजी सैनिकांचे सर्वतोपरी सहकार्य देऊ असे प्रतिपादन माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सल्लागार माजी सैनिक तथा माजी न.प. उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी येथील पंचायत समितीच्या डॉ. शंकरराव चव्हाण सहभागृहात प्रशासनाच्या वतीने आयोजित आजी-माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य सैनिकाच्या सन्मान सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी
नायब तहसीलदार संजय नागमवाड, नगरपरिषदेचे लेखापाल रामेश्वर वाघमारे,महिला बालविकास अधिकारी सुमेध ससाणे,माजी न.पा.उपाध्यक्ष तथा माजी सैनिक लक्ष्मणराव देवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष देवराव नागोबा चौदंते माजी सैनिक,सुनील चौदंते, भास्कर कळणे,विद्याधर तहकीक,लक्ष्मणराव देवदे,प्रभू महालिंग अप्पा घोंगडे,,विकास बल्फेवाड,,संजय देवदे,साईनाथ राठोड, देविदास पवार, साहेबराब वने,मारोती गुंडे,चंद्रकांत तेलंगे,शशीकांत मोडवान,बालाजी गव्हाणे,आनंद संभोड,रावसाहेब ढगारे,प्रकाश पिन्नलवार,माधव पवार,बालाजी ईबितवार,दिलीप तेलंगे,राजाराम हळदे अशा एकूण चोवीस माजी सैनिक बांधवांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आपल्या शाहिरीच्या माध्यमातून धनगाव येथील शाहीर गोपीचंद हेमके व अविस कुरेशी यांनी उपस्थितांना प्रभावित करणाऱ्या शहीरीचे उल्लेखनीय सादरीकरण केले. खरी देश सेवा ही आजी-माजी सैनिकाकडून शिकवी व त्यांच्या सन्मान करावा असे, मनोगत आपल्या अध्यक्ष समारंभातून बोलताना गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांनी व्यक्त केले, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनीही यावेळी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रेय उचलवाड यांनी केले तर आभार विस्ताराधिकारी (ग्राम पंचायत) समिती कैलास गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती.

COMMENTS