*सवंगडी बॅच तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान*

    *गंगाखेड (प्रतिनिधी)*    शहरातील सरस्वती विद्यालयात 1984 ला इयत्ता दहावीला शिक्षण घेतलेल्या सवंगडी बॅच तर्फे बँकेत स्थिर निधी ठेवून त्य...

  


 *गंगाखेड (प्रतिनिधी)* 

  शहरातील सरस्वती विद्यालयात 1984 ला इयत्ता दहावीला शिक्षण घेतलेल्या सवंगडी बॅच तर्फे बँकेत स्थिर निधी ठेवून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून याच विद्यालयातुन गुनानुक्रमे सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम 2100 रुपये, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते. मार्च 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी राधिका प्रशांत जोशी या विद्यार्थिनीने हा मान पटकावला. तसेच विवेक घण यांची आई श्रीमती मंगलाबाई चिंतामणराव घण यांच्या स्मरणार्थ 2100 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह हा दुसरा पुरस्कार देखील या विद्यार्थिनीस देण्यात आले आला. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष नळदकर, सचिव दीपक तापडिया यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पछाडे तर आभार प्रदर्शन गोपाळ मंत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मु.अ.लक्ष्मण मादरपल्ले, उपमु. छाया घोळवे, सवंगडी कट्टा चे प्रमुख रमेश औसेकर, राजू गळाकाटू, दशरथ सूर्यवंशी, नितीन चौधरी, विलास मंगरूळकर, विनायक दीडशेरे, सुरेंद्र नळदकर, बालाजी टोले, अण्णा जंगले, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब निरस, सुरेश नांदुरकर, उमा ब्याळे,रेणू घण,अनंत काळे आदींनी प्रयत्न केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel