किनवट - शहरातील शांततेची परंपरा कायम ठेवत शासन नियमांच्या अधीन राहून पोळा,गणेशोत्सव आदी सण शांततेत,परंपरागत पद्घतीने साजरे कर...
किनवट - शहरातील शांततेची परंपरा कायम ठेवत शासन नियमांच्या अधीन राहून पोळा,गणेशोत्सव आदी सण शांततेत,परंपरागत पद्घतीने साजरे करावेत,असे आवाहन पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दि.२१ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.त्याप्रसंगी ते बोलत होते.बैठकीस नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे, नगरसेवक अभय महाजन, हबीब चौहान,साहेबराव पवार,शिवा क्यातमवार,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, विभिषण पाळवदे,आसिफ मौलाना, हाफिज शरफोद्दीन,सैफ मौलाना,सुगत नगराळे आदींसह विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.साळुंखे पुढे म्हणाले की,गणेश मंडळांनी निर्धारित वेळेत परवानगी घ्यावी,गणेशोत्सव साजरा होताना तरुणांत उत्साह असतो.इतर धर्मियांच्या भावनांचा आदर करावा.गणेशोत्सवातून सामाजिक एकतेचा संदेश देणारे उपक्रम राबवावेत,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,हबीब चौहान, साहेबराव पवार यांनीही विविध सूचना केल्या.प्रास्ताविक फौजदार मिथून सावंत यांनी केले.सूत्रसंचालन बोंडलेवार यांनी केले.फौजदार गणेश पवार यांनी आभार मानले.

COMMENTS