एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली होती पण गेल्या दीड महिन्यात राज्यात 137...
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली होती पण गेल्या दीड महिन्यात राज्यात 137 आत्महत्या झाल्या आहेत मराठवाड्यात तर आत्महत्यांचे हे सत्र अजूनही थांबलेलं नाही मुख्यमंत्री काही दिवसापूर्वी येऊन गेले पण नांदेड मधील शेतकऱ्यांना मदत काही मिळाली नाही कृषिमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार पहिल्यांदा मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत आज त्यांच्या दौऱ्यावरून ठोस तातडीची अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही
नांदेड जिल्ह्यात शेतात अजूनही पाणी साचलेला आहे दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली पिकांना जगवणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी मृत्यूला कोटाळत आहेत नांदेड जिल्ह्यात 3 लाख 58 हजार 771 हेक्टर वरील पिके वाहून गेली आहेत यात 6 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे सर्वाधिक नुकसान किनवट तालुक्यात झाले असून सुमारे 49 हजार 332 हेक्टर वरील पिके भुई सपाट झाली आहेत त्या खालोखाल हिमायतनगर तालुक्याचा नंबर लागत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे पिकांची म्हणावी तशी वाढ होत नसल्याने शेतकरी हवल दिवस झाले आहेत या तालुक्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे
नांदेड जिल्ह्यात 1 ते 19 ऑगस्ट दरम्यान ११ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पाऊल उचलले आठ दिवसात किनवट तालुक्यातील कोसमेट व याच तालुक्यातील जमुनानगर येथील दोन शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली परभणी जिल्ह्यातही स्वातंत्र्यदिनी पारवा येथील शेतकऱ्याने रेल्वे समोर उडी मारून मृत्यूला कवटाळले होते जालना जिल्ह्यातही दोन ते नऊ ऑगस्ट दरम्यान तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या
*कर्जबाजारीपणामुळे पुन्हा एक आत्महत्या नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने किनवट तालुक्यातील जमुना नगर येथील शेतकरी जयसिंग मानसिंग आडे 60 यांनी विष पिऊन आत्महत्या केली ही घटना 18 ऑगस्ट रोजी घडली. नांदेड जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी शेतात साचलेल्या पाण्याचा उपसा अद्याप झालेला नाही त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे पिकांना जगवणे अवघड होऊन बसले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत मागील दीड महिन्यापासून शेतकरी दीड महिन्यात आतापर्यंत 21 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे जीवन यात्रा संपवली आहे शेतकरी जयसिंग यांच्या आत्महत्या प्रकरणी सुभाष उद्धव आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पिकाची स्थिती पाहून निराश शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता जयसिंग हे शेतातील कापसाची परिस्थिती बघून निराश झाले एसबीआय बँकेचे कर्ज व इतर कर्ज असल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची या विवेचनेत त्यांनी विष घेतलं

COMMENTS