कंधार (प्रतिनिधी) कंधार येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत सरवरे मगदूम साहेब यांच्या दर्शनासाठी नांदेडहुन आलेल्या बाप लेकासह दोन सख्या भावाचा आणि...
कंधार (प्रतिनिधी)
कंधार येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत सरवरे मगदूम साहेब यांच्या दर्शनासाठी नांदेडहुन आलेल्या बाप लेकासह दोन सख्या भावाचा आणि मेहुण्याचा जगतुंग समुद्रात बुडून मृत्यु झाला.नांदेड येथील करबला,खुदबे नगर आणि इकबाल नगर नांदेड येथील भाविक आपल्या ऑटोरिक्षा क्रं MH-26BD4531 या प्रवाशी वाहनातून कंधार येथील हजरत सरवरे मगदूम साहेब दर्ग्याला आले होते त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब आणि लहान मुलांचा समावेश होता.
सकाळी ११ च्या दरम्यान हे भाविक दर्शनासाठी आले होते काही वेळानंतर श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे जगतुंग समुद्राच्या किनारी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक मुलगा मोहम्मद साद मो.सफीयोद्दीन व्य १५ वर्ष हा पाण्याजवळ प्लेट धुण्याकरिता गेला असता पाय घसरून पडला असता तो बुडत असल्याचे पाहून त्याचे वडील मोहम्मद सफियोद्दीन मो.अब्द्दुल गफार वय वर्ष ३८ हा आपल्या मुलाला व्हाचवण्याकरिता गेला असता तो हि बुडत असल्याचे पाहून त्यांनी आपला मेव्ह्नना मोहमद विखारोद्दीन मो.फारोद्दीन वय वर्ष ४४ याला आवाज दिला तत्पूर्वी सय्यद नविद सय्यद वाहिद वय १५ वर्ष आणि त्याचाच सखा भाऊ सय्यद सोहेल सय्यद वहिद वय वर्ष २० यांनीही पाण्यात उडी टाकून वरील व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाण्यातील असलेल्या काटेरी कुंपणाच्या जाळ्यात अडकले असल्यामुळे यांचा जीव वाचवता आला नाही.त्यामुळे यांनाही जीव गमवावा लागला. शेवटी मोहम्मद विखारोद्दीन यांचा हि पाण्यात बुडून मृत्यु झाला. या वेळी सहावा व्यक्ती सय्यद वहिद आपले सक्खे २ मुले सय्यद नविद सय्यद वाहिद वय १५ वर्ष आणि सय्यद सोहेल वय वर्ष २० यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेऊन वाचवताना प्रयत्न केला पण त्याचा अंत लागला नाही तर त्यांच्या दोन मुलाला वाचवता आले नाही पण नशीब बलवत्तर म्हणून या कुटुंबातील सदश्य आपला प्राण वाचवण्यात यशस्वी ठरला आहे.
कंधार पुलिसांनी आणि दर्गापुरा,नवरंगपुरा येथील नागरिकांनी सदर भाविकांना कंधारच्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यासाठी मदत केली. यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ,उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार,नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक मोरे,तहसीलदार व्यंकटेश मुंडे,उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक,कंधार ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पोरे,डॉ.जी.एम मोरे,कंधारचे माजी नगराध्यक्ष जफरोद्दीन बहोद्दीन,उप नगर अध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे,बब्बर साहाब,शेकापचे शेरूभाई आदी सहा कंधार येथील नागरिकांनी कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते.

COMMENTS