मुदखेड (ता.प्र.) मुदखेड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन, शहरातील भिमनगर येथे दि.२० ऑगस्ट २०२२...
मुदखेड (ता.प्र.) मुदखेड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन, शहरातील भिमनगर येथे दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ०८ वाजेच्या सुमारास राजु चंदर चौदंते यांची होंडा शाईन नावाची दुचाकी मोटर सायकल क्र.एम एच - २६ - बि.यु- ६७५४ हि गाडी त्यांच्या राहत्या घरासमोरुन चोरट्यानी चोरून नेली आसल्याची लेखी तक्रार मुदखेड पोलीस स्टेशन येथे नोंद केली आहे. या आदी शहरातील गुजरी गल्लीतील रहिवासी मोहोम्मद इब्राहिम मो. एकबाल बागवान एम.एच २६-बि जी -०२४६ हि दुचाकी वाहन देखील दि. २३ जुलै रोजी रात्री ०२ च्या सुमारास चोरीला गेली आसलल्याचे मोहोम्मद इब्राहिम मो. एकबाल बागवान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
एका वर्षात मुदखेड शहरात दुचाकी वाहन, सोने चांदीचे दुकान, मोबाईलची दुकान, खत बियाणे दुकान, इतर ठिकाणी चोरीचे प्रमाण वाढले असुन, दुचाकी वाहन चोरट्यांनी जनतेच्या नाकी नऊ आणून सोडले आहे, या दुचाकी वाहन चोरट्यांनी पोलीस प्रशासना समोर मोठे आव्हान ! ठेवल्याचे सुजाण नागरिकातून ऐकन्यास मिळत आहे याकडे पोलीस प्रशासन त्वरित लक्ष देऊन दरोडेखोर व दुचाकी वाहन चोरट्यांनची मुसक्या आवळतील का? याकडे शहरातील नागरिकाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS