भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना मागील वेतन कराराची थकबाकी मिळाली, मात्र मुंबई बंदरातील कामगारांना २० टक्केच थकबाकी मिळाली असून, उर्वरित थकबाकी लवकरच मिळेल, असे स्पष्टपणे मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सी. जे. मेंडोसा यांनी जाहीर सभेत सांगितले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने १३ ऑगस्ट २०२२ रोजी परेल येथील दामोधर हॉलमध्ये ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सुरवातीला सर्व मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेला ५५० सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे, जास्त पाणी पिणे व सकाळी चालणे, व्यायाम करणे. मुंबई पोर्ट ट्रस्टने आपणास चांगली पेन्शन दिली असून, आरोग्यासाठी रुग्णालयाची व्यवस्था आहे. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, कल्पना देसाई, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी प्रजापती, चौधरी, सेवानिवृत्त अधिकारी एस.एस. यादवडकर, असोसिएशनचे पदाधिकारी जे. आर. पाटील, धींग्रेजा, इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. स्वागतपर भाषण विजया कुलकर्णी व कोलॅसो यांनी केले तर आभार चिपळूणकर यांनी मानले. या सभेस मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश दाते, अनिल गोलटकर, अजित काकडे, मालुष्ट्ये, गोवेकर, ए. आर. वागवारे, आर. एन. गावडे, एम. डी. सुतार, एच. जी. पाटील, ए. टी. शिंदे, ए. एल. वायंगणकर,प्रकाश घाग, प्रकाश पवार, म्हाडगुट आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आपला
मारूती विश्वासराव
प्रसिध्दीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन


COMMENTS