भारतातील प्रमूख बंदरातील बंदर व गोदी कामगार आपल्या न्याय मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध ५ एप्रिल २०२२ रोजी एकजुटीने एक दिवसाचा लाक्षणिक संप आहेत.
या संपात द्विपक्षीय वेतन समितीची बोलणी ताबडतोब सुरू करावी, मेजर पोर्ट ऑथोरिटी ऍक्ट २०२१ मुळे बंदरावर व कामगारांवर होणारे दुष्परिणाम याची चर्चा करून मार्ग काढावा,मागील वेतन कराराची अंमलबजावणी करणे, मुंबई बंदरातील कामगार व सेवानिवृत्त कामगारांना मागील वेतन कराराची उर्वरित थकबाकी त्वरित द्यावी, २०२०- २१ च्या पी. एल. आर. (बोनस ) योजनेत त्वरित सुधारणा करावी, बंदराचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, जवाहरद्वीप येथे मुरिंग कामाचे कंत्राटीकरण करू नये, पेन्शन फंडातील तूट भरून काढणे या व इतर प्रमुख मागण्यांसाठी ५ एप्रिल२०२२ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ६ एप्रिलला सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासासाठी हा संप आहे. या संपात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समिती व मुंबई पोर्ट ट्रस्ट एस.सी. एस. टी. वेल्फेअर असोसिएशन या सर्व संघटनांचे कामगार सहभागी होणार आहेत, संप यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत पी. डिमेलो भवन, कामगार सदन श्रमिक भवन, इंदिरा गोदीत विविध ठिकाणी मिटिंग झाल्या. संप शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, केरशी पारेख, विद्याधर राणे, दत्ता खेसे, मारुती विश्वासराव, निवृत्ती धुमाळ, कल्पना देसाई, शीला भगत, कॉ. उदय चौधरी, मिलिंद घनगुटकर, नंदू राणे, संजय माधव, अंकुश कांबळे, संजय थोरावडे,विजय कांबळे इत्यादी कार्यकर्त्यानी विविध ठिकाणी मिटिंग घेऊन कामगारांना संपाबाबत मार्गदर्शनपर केले. त्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होईल, दरम्यान संपटून मार्ग काढण्यासाठी इंडियन पोर्ट असोसिएशनच्या चेअरमननी ४ एप्रिलला सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरकद्वारे सर्व फेडरेशनचे कामगार नेते व पोर्टचे अधिकारी यांची मिटिंग आयोजित केली आहे. मात्र मागण्या मान्य झाल्यास संप निश्चित होणार आहे.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS