केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगार ५ एप्रिल २०२२ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत, या संपाची तयारीसाठी गोवा येथील वास्को मधील गोवा पोर्ट एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयात लक्ष्मीकांत गावडे यांच्या अध्यक्षतेखाली युनियनचे पदाधिकारी व कामगार कार्यकर्त्यांची १ एप्रिल २०२२ रोजी मिटिंग झाली. संप यशस्वी करण्यासाठी कामगार एकजुटीची आवश्यता आहे, बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या पगरवाढीसाठी द्विपक्षीय वेतन समितीची बोलणी ताबडतोब सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी ५ एप्रिल रोजी होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सर्व कामगारांनी सहभागी व्हावे, असे आव्हान मार्मागोवा पोर्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गावडे व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव यांनी कामगार कार्यकर्त्यांना केले, याप्रसंगी युनियनचे जनरल सेक्रेटरी संदेश सातारडेकर, खजिनदार अभय राणे, उपाध्यक्ष गौतम सावंत, बाळकृष्ण फलदेसाई व इतर पदाधिकारी अगस्टइनो फर्नांडिस, श्रीकृष्ण खराडे, दिलीप नाईक,संजय नाईक, सागर नायक, स्टँली मेंझिस, शिवा कलबुर्गी, ज्ञानेश्वर पेडणेकर, अरुण शेट्ये व कामगार कार्यकर्ते हजर होते. संध्याकाळी ५ वाजता या बंदरातील दोन्ही प्रमुख कामगार संघटनांची संयुक्तपणे द्वारसभा झाली, त्यामुळे आता ५ एप्रिलला गोवा पोर्टमध्ये शंभर टक्के संप यशस्वी होईल.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS