जागतीक मूर्ख दिनानिमित्त PVR टॉकीज़ येते मोफत पाणी बॉटल वाटप
लातूर:-सध्या प्रेरणादाई/मार्गदर्शक इतिहास दर्शक पावनखिंड,झुंड,द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची वाढती गर्दी त्यात उन्हांची दाहकता लक्षात घेवून प्रेक्षकांना मूर्ख समजून आर्थिक लुटीच्या उद्देशाने PVR चित्रपट गृहात चालकाकडून 50 रुपये दराने पाणी बॉटल व चढ्या दराने खाद्यपदार्थ विक्री करुन प्रेक्षकांना आर्थीक लूट होत असल्याच्या निषधार्थ विर योध्दा विद्यार्थी संघटनेचे वतीने 1 एप्रिल जागतिक मूर्ख दिनाचे औचित्य साधून PVR चित्रपट गृहातील कर्मचारी प्रेक्षकांना मोफत पाणी बॉटल वाटप करून गांधी गिरी मार्गाने अभिनव आंदोलन करून लवकरच pvr चित्रपट गृहातील पिण्याच्या पाण्या सह खाण्याच्या वस्तूवरील दर नियंत्रनात नाही आणल्यास विर योध्दा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विर योध्दा विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज धनगर इत्यादींच्या वतीने देण्यात आला,सदरील आंदोलनास संघटनेचे प्रदेश प्रमुख नितीन दादा मोहनाळे, लातूर संपर्क प्रमुख दयानंद गव्हाणे, लातूर उप जिल्हा प्रमुख युवराज कतारी तसेच जिल्हा संघटक दीपक तांदळे व पांडुरंग क्षीरसागर व संघटनेचे शिलेदार उपस्तीत होते.

COMMENTS