नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सपोउपनि. सुरेश पुरी यांना निरोप

नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेड 'ग्रामीण' पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक तथा वाहनचालक सुरेश नारायणराव पुरी हे ३६ वर्षाच्या...


नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेड 'ग्रामीण' पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक तथा वाहनचालक सुरेश नारायणराव पुरी हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मार्च रोजी सेवानिवृत झाले असून, यानिमित्त नांदेड ग्रामीण ठाण्याच्या वतीने सपोउपनि. सुरेश पुरी यांचा सपत्निक सत्कार करून निरोप देण्यात आला.

नांदेड 'ग्रामीण' पोलीस ठाण्यात ३१ मार्च रोजी रात्री पार पडलेल्या या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची उपस्थिती, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नागोराव कपाळे, ओंकार पुरी, आदित्य पुरी, आकांक्षा पुरी व अनुसयाबाई सुरेश पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी, नांदेड ग्रामीण ठाण्यातील पो. नि. अशोक घोरबांड, सपोनि. सुरेश थोरात, विश्वजीत कासले तसेच गणेश होळकर, पोउपनि. आनंद बिचेवार, विजय पाटील, बि. टी. केंद्रे, पोउपनि. अशोक देशमुख व महिला हेडकॉन्सटेबल आशा केंद्रे, यांच्या हस्ते सेवानिवृत्त सपोउपनि. सुरेश पुरी तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया पुरी यांचा साडी-चोळी, दस्ती, टोपी, शाल, पुष्पहार, श्रीफळ व भेट वस्तु देवून यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ठाणे अंमलदार तथा सपोउपनि. गंगाधर भालेराव, सपोउपनि. ज्ञानोबा गिते, सपोउपनि. शेषराव शिंदे, सपोउपनि. गोतम कांबळे, पोलीस हेडकॉन्सटेबल संभाजी व्यवहारे, चालक पो.ना. दत्तात्रय पवार, पोलीस नाईक बालाजी दंतापल्ले, सुनिल गटलेवार, शंकर बिरमवार, शिवाजी कानंगुले, राजू हुमनाबादे, ज्ञानोबा कौठेकर, लालजी आडे, पो.कॉ. उध्दव पवार, माधव माने, विश्वनाथ पवार, चंद्रकांत स्वामी, पो. कॉ. जुबेर चाऊस, महिला पो.कॉ. अनिता वाडीकर, भाग्यश्री सुर्यवंशी व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, सपोनि. सुरेश थोरात, सपोनि. विश्वजित कासले, पोउपनि. गणेश होळकर, आनंद बिचेवार आदींनी वाहनचालक तथा सपोउपनि. सुरेश पुरी यांच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. तर सत्कारमुर्ती सुरेश पुरी यांनी, पोलीस दलात सेवा बजावत असताना सर्वांनी कुठलीही आशाअपेक्षा न करता प्रामाणिकपणे सेवा करा,लाभ तुम्हाला नक्की मिळेल, असे स्पष्ट करून आई-वडिलांची सेवा करा, असा प्रांजळ सल्लाही दिला आहे. त्याचवेळी, पोलीस दलात कर्तव्य बजावताना घरातील सर्व मंडळींसाठी आपणास वेळ कसा देता येईल, याकडे लक्ष द्या व लेकरांचे भवितव्य घडवा, असे नम्र आवाहन पुरी यांनी यावेळी केले. 

अध्यक्षीय समारोपात पो. नि. घोरबांड यांनी, संकटं माणसाला मजबूत बनवत असतात,असे स्पष्ट करून जो सगळ्यांना मदत करतो तो सर्वांच्या आठवणीत राहतो, असे सांगितले. याशिवाय, चांगल्या माणसांचे कौतुक करण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो, असेही पो.नि. घोरबांड यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले. सहायक पो.नि. विश्वजीत कासले यांनी प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन करून प्रमुख मान्यवर आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group