राम दातीर माहूर (प्रतिनिधी)चैत्र प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ होतो.घरोघरी गुढी उभारून या नूतन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी)चैत्र प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ होतो.घरोघरी गुढी उभारून या नूतन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने करण्यात आले. गुढीपाडवा हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण मराठी नवीन वर्षारंभ गुढीपाडव्यापासून होतो. माहूर शहरात शनिवारी सकाळी ठिकठिकाणी रांगोळी काढून गुढी उभारणीची तयारी करण्यात आली.आंब्याच्या पानांचे तोरण लावून या सणाच्या उत्साहात भर पडली. त्यानंतर घरोघरी गुढीची उभारण्यात आली. विजयाची आनंदाची आणि एका चांगल्या पर्वाची सुरुवात या अर्थाने गुढी उभारली जाते. ही गुढी उभारून नव्या उत्साहाने नवीन वर्षाला सुरुवात करण्यात आली. एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देत गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

COMMENTS