राम दातीर
माहूर (प्रतिनिधी) उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने जीवाची लाहीलाही होत असल्याची बाब लक्षात घेत विनायक शेवाळे मित्र मंडळाने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेवाळे कॉम्प्लेक्स मध्ये कृष्णाई नामे पाणपोईला सुरुवात केली.
दर्शनार्थी भाविक, कार्यालयीन काम व खरेदी-विक्रीसाठी येणारी तालुक्यातील मंडळी, विदयार्जनासाठी येणारे विद्यार्थी यांच्यासाठी या पाणपोईचा उपयोग होणार आहे. पाणपोईचे उदघाटन नगर पंचायतचे उपनराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, द पॉवर ऑफ मीडियाचे मराठवाडा विभाग प्रमुख वसंत कपाटे, तालुकाध्यक्ष नंदकुमार जोशी,राज ठाकूर, अपील बेलखोडे, पवन कोंडे, गजानन कुळकर्णी,एस. एस. पाटील,संजय पेंदोर आदींची उपस्थिती होती. या पाणपोईचा लाभ परिसरातील येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना व भाविकांना होणार असल्याने विनायक शेवाळे व त्यांच्या मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


COMMENTS