त्याच तळ्यात उडी मारून जलसमाधी घेईल!* {आमदार राजेश पवार यांचा गर्भगळीत इशारा

  •••शेतकऱ्यांची उन्हाळी पिके पाण्याअभावी वाळू लागली•••• नायगाव-  प्रतिनिधी- कंधार तालुक्यातील बारूळच्या तळ्याचे पाणी उच्च दाबाने सोडले नाही...

 


•••शेतकऱ्यांची उन्हाळी पिके पाण्याअभावी वाळू लागली••••

नायगाव-

 प्रतिनिधी- कंधार तालुक्यातील बारूळच्या तळ्याचे पाणी उच्च दाबाने सोडले नाही तर त्याच तळ्यात उडी मारून जलसमाधी घेईल असा गर्भगळीत इशारा नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कंधार तालुक्यातील बारूळचे तलाव सिंचन क्षेत्र हे नायगाव व बिलोली तालुक्यात पर्यंत पोहोचते. त्या पाणी पाळीच्या भरवशावर त्या परिक्षेत्रातील शेतकरी उन्हाळी पिके घेतात. आज घडीला उन्हाळी पिके हे वाळावयास चालू झाली असून बारूळ तळ्याच्या पाणी पाळी संदर्भात 25 मार्च पासून शेतकऱ्यांच्या पोटतिडकीच्या प्रतिक्रिये नुसार आमदार राजेश पवार हे प्रयत्न करीत होते. पण त्यांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली होती. दरम्यानच्या काळात पाणी तर सोडले पण तेच कमी दाबाने सोडल्या गेल्यामुळे हे पाणी वेळेच्या आत संबंधित कार्यकक्षेत पोहोचणार नाही हे सिद्ध झाल्यावर शेतकऱ्यांच्या भावना जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या संदर्भात शासन व प्रशासनच्या विरोधात अतिशय कठोर भूमिका घेत गल्ली ते दिल्ली पर्यंत धाव घेणारे आमदार राजेश पवार यांनी आपल्या फोन वरून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलत बारुळच्या तळ्याचे पाणी उच्च दाबाने जर नाही सोडले तर मी त्याच तलावात उडी मारून जलसमाधी घेईल असा इशारा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली व अधिकारी भांबावले व त्यांनी उच्च दाबाने पाणी सोडले.

*◾ आमदार राजेश पवार हे खरोखरच शेतकऱ्यांच्या हितासाठी आजतागायत शासन व प्रशासन दरबारी सातत्याने विविध प्रश्नाबाबत पाठपुरावा करीत आहेत. प्रसंगी खूप मोठे कठोर निर्णयही घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार यांनी बारूळ तळ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून उपरोक्त विधान केल्यानंतर त्यांनी ही बातमी आपल्या फोनवरून संबंधित ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्यांना सांगितले. अधिकाऱ्यांना कशी तंबी भरल्याचेही सांगितले. पण त्याच शेतकऱ्यांनी आमदार राजेश पवार यांची कॉल रेकॉर्ड व्हायरल करून त्यांच्या भाषा शैली बद्दल ज्ञात करायचा प्रयत्न केला.व विरोधकांनी या गोष्टीचा फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी आमदार राजेश पवार अगदी उद्विग्न मनस्थितीत शेतकऱ्यांच्या बाजूने व अतिशय पोटतिडकीने ह्या गोष्टी अधिकाऱ्यांना आपल्या भाषेत समजून सांगितले यामुळे विरोधक जरी या गोष्टीचा फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण असून आमदार राजेश पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

* क्रमांक- 2 बारूळ तलावाच्या कालव्याचा असो वा इतर टेक्नीकल प्रश्नांचा असो दुरुस्तीचे काम असतात ती वेळेत करून घ्यावयाची असतात. दोन पाणी पाळ्यांच्या मध्ये ही कामे झाली पाहिजेत. पण त्यांनी ती केली नाहीत. परिणामी पाणी वेळेत सोडता आले नाही. आणि सोडले तर ते कमी दाबाने सोडल्यामुळे उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होण्याचे चिन्ह दिसत असून सदरील अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group