केज / प्रतिनिधी मौजे आवसगावं येथील रहिवाशी सौ.मीरा गोविंद शिनगारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव...
केज / प्रतिनिधी
मौजे आवसगावं येथील रहिवाशी सौ.मीरा गोविंद शिनगारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या तर वैभवशाली मराठवाडा न्यूज चॅनलचे संपादक गोविंद नाना शिनगारे यांच्या पत्नी होत्या.त्यांच्या पश्चात पती,मुलगी,सासू ,सासरे ,दिर ,जाऊ असा परिवार आहे.
आपल्या मनमिळावु स्वभावाने त्या सर्व परीचीत होत्या .रविवारी दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता .त्यांच्या मनमिळावु स्वभावामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे .
COMMENTS