धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद शहरात शिवजी नगर येथे ६५ वा धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळा साजरा करण्यात आला.तथागत भ.गौतम बुद्ध ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माधव वाघमारे कांगठीकर यांनी भुषविले असुन प्रमुख पाहुणे मा.सदानंद देवके अध्यक्ष भा.बौ.महा.सभा.,मा.दयानंद भेरजे आणि अशोक ढवळे यांनी सभेला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात शालेय मुलांची भाषण स्पर्धा घेण्यात आली. परिक्षक म्हणून मा. सुदर्शन वाघमारे पत्रकार व मा.शिवराज गायकवाड ता अ.भिमशक्ती यांनी काम पाहिले व खालील परिक्षार्थींनी कु.सावली अशोक ढवळे प्रथम,कु.अश्वीणी माधव वाघमारे द्वितीय,तर प्रिती प्रकाश कांबळे तृतीय पारितोषिक पटकावले,असे प्रशिक्षकांनी जाहीर करून पारितोषिक वितरण केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गौतम कैवारे यांनी केले
कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते.
मा.ताहेर पठाण शहराध्यक्ष कांग्रेस,मा.श्रीदास वाघमारे जेष्ठ कार्यकर्ते,प्रा.सुधाकर वाघमारे,
सुरेश भद्रे, गंगाधर वाघमारे,
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवलिंग करकले,
संभाजी डाकोरे,
आनंद रामटके,धम्मप्रकाश जेवारे,
प्रकाश कांबळे, गंगाधर रामटके, विठ्ठल रामटके, गौतम लोखंडे,नागोराव काळेवार व नारायण वाघमारे यांनी सहकार्य केले.
COMMENTS