*फाल्गुनी नदीवरील पुलावरून ट्रॅक्टरसह पाच जण पाण्यात बुडाले तत्पर प्रशासनाने जीव वाचवले* सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील...
*फाल्गुनी नदीवरील पुलावरून ट्रॅक्टरसह पाच जण पाण्यात बुडाले तत्पर प्रशासनाने जीव वाचवले*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील गोदाकाठावरील रस्ते व पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून तालुक्यातील वाहणाऱ्या फाल्गुनी नदीला १७ ऑक्टोंबर रविवार रोजी पूर आल्याने शेळगाव येथील फाल्गुनी नदीवरुन नेहमीप्रमाणे थडीउक्कडगावकडे ट्रॅक्टरमध्ये जाणारे इसम प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेने वाचले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की,१)दिपक गुलाब कदम वय २७वर्षे,२)बाबासाहेब सुभाष कदम वय ३२ दोघे रा.थंडीपिंपळगाव,३)गोट्या राजेभाऊ कांबळे वय ४५ रा.शेळगांव,४) रामा धुराजी उफाडे वय ४३)रा.गंगापिंपरी,५) शिवाजी बबन आडे वय ४२ रा. शेळगांव तांडा हे पाच जण आपल्या ट्रॅक्टरमधून गावाकडे जात असताना रोडवर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने रात्रौ ८:३०
वा.ट्रॅक्टरसह पाण्यात वाहून गेले होते.ही माहिती ग्रामस्थांना कळताच गावकरी नदीकाठावर जमा झाले.यावेळी प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पूढील सूत्रे हलवली असता तब्बल दीड तासाच्या अथक परिश्रमाने या झाडावर अडकून पडलेल्या पाचही जणांना पाण्याबाहेर काढण्यात प्रशासनास यश आले मात्र यातील एक जण घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्यास उपचारासाठी सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या घटनेत ट्रॅक्टरचा शोध लागला नसल्याने सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठावरील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.दरम्यान या मोहिमेत तहसीलदार सारंग चव्हाण,पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिरी, नायब तहसीलदार अनिल घनसावंत,पोलीस पाटील कुऱ्हाडे,आदींनी अडकून पडलेल्या ५ जणांना बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले
COMMENTS