प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
नांदेड परिक्षत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्याची वार्षीक तपासणी करणार असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. डिआयजींच्या वार्षीक तपासणी साठी सर्वच पोलिस अधिकारी कर्मचारी कामाला लागले आहेत. नांदेड परिक्षत्राला लाभलेले डिआयजी निसार तांबोळी हे महाराष्ट्र पोलिस दलातील शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन ओळखले जातात. 10 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत डिआयजी तांबोळी हे हिंगोलीत ठाणेवार्षीक तपासणी साठी येणार असुन यामध्ये एक उपविभागीय अधिकारी कार्यालय व चार पोलिस ठाण्याची तपासणी करणार आहेत. यापैकी अचानक कुठल्याही ठाण्याला भेट देऊन वार्षीक तपासणी करू शकतात म्हणून सर्वच ठाणेदाराकडून प्रलंबीत गुन्ह्याचा निपटारा करण्यात येत आहे. वार्षीक तपासणी दरम्यान पोलीस ठाण्याची अंतरबाह्य तपासणी, सर्व प्रकारचे अभिलेखे, गुन्हे व तपास, शस्त्रास्त्रे अद्यावतता, तंटामुक्त समित्यांचे कार्य, महत्त्वाची कागदपत्रे, स्वच्छता, फाईलींची तपासणी यासोबतच पोलिस ठाण्याचा परिसर व संबंधीत सर्व बाबींची तपासणी डिआयजी तांबोळी करणार आहेत. वार्षीक तपासणी दरम्यान कोणत्या ठाणेदाराच्या पाठीवर डिआजीं कडून कौतुकाची थाप पडते याकडे जिल्हा पोलिस दलाचे लक्ष लागले आहे. डिआयजींच्या वार्षीक तपासणी दौरान जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतुन वसमत महामार्गावरील चोरी, लुटमार सारख्या घटनांना अळा घालण्यासाठी व अपघातातील जखमींना पोलिसांची तात्काळ मदत मिळण्यासाठी कुरूंदा पोलिस ठाण्याअंतर्गत चोंढी येथे निर्माण करण्यात येणाऱ्या भव्य पोलिस चौकिचे उदघाटन निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
COMMENTS