केज / प्रतिनिधी
दिनांक ०७-१०-२०२१ रोजी
पॕन इंडीया अवेरनेस अंतर्गत 'आझादी का अमृत महोत्सव' निमित्त तालुका विधी सेवा समिती आणी वकील संघ, केज यांच्या वतीने गुरुवारी पिंपळगाव,एकुरका,सासुरा व जोला येथे नागरिकांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी केज न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती मनीषा थोरात व केज वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. शिबिराची सुरुवात घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॕड.नाईकवाडे यांनी केले. यावेळी न्यायाधीश श्रीमती थोरात यांनी राष्ट्रीय विधी सेवा समितीचे कार्य व त्यांचेमार्फत दिल्या जाणा-या सेवा याबाबत मार्गदर्शन केले. अॕड.डी.टी. सपाटे यांनी ज्येष्ठांचे अधिकार याबाबत सांगून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. अॕड. अनिता मुंडे यांनी महिलांचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व गावांमध्ये मान्यवरांच्या हस्त्ते गावकऱ्यांना कायदेविषयक पत्रके देण्यात आली. या शिबिरासाठी अॕड.डी.टी.सपाटे, अॕड.ई.जे.तांदळे,अॕड जे.जी.बारगजे, अॕड. जीवन बांगर, अॕड.एन.आर.शिंदे, अॕड.यादव,अॕड.गायकवाड, अॕड. नाईकवाडे, अॕड. अनिता मुंडे, अॕड. डी.डी.गित्ते, ग्रामसेवक श्रीमती मोराळे, ग्रामसेवक किरण ठोंबरे, पिंपळगावचे सरपंच श्री. घोळवे, एकुरक्याच्या सरपंच श्रीमती धस, सासु-याच्या सरपंच श्रीमती वाघमारे, जोल्याच्या सरपंच श्रीमती ढाकणे, बीट अंमलदार आणि गावकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS