पीककर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घ्या सखाराम बोबडे यांची शाखाअधिकार्‍यास विनंतीगंगाखेड प्रतिनिधी 

पीककर्जापासून तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घ्या अशी विनंती परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी एसबीआय शाखा अधिकाऱ्यास शेतकर्‍यासह प्रत्यक्ष भेटून मंगळवारी केली.


पिक कर्ज मिळण्यासाठी बँकेकडून नको त्या जाचक अटी लादल्या जात असल्याची तक्रार महातपुरी येथील शेतकरी बळीराम इंगळे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे केली होती. यावरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शेतकरी बळीराम इंगळे, निवृत्ती मुळे व इतर शेतकर्‍यासह थेट एसबीआयच्या डॉक्टर लाइन शाखेस प्रत्यक्ष भेट दिली. शाखाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना पिक कर्ज का मिळत नाही याची विचारणा केली. त्याचबरोबर तालुक्यातील एकही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घ्या, पीक कर्ज देण्यात काही अडचणी येत असतील तर आम्ही प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले. बँकेत शेकडो चकरा मारूनही अधिकारी-कर्मचारी दाद देत नसल्याने आज शाखा अधिकाऱ्याकडून मिळालेल्या समर्पक उत्तराने शेतकरी समाधानी झाले. यावेळी महातपुरी चिलगरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या