( रामप्रसाद चन्नावार )
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व एज्यूकेशन सोसायटी नायगांव बा यांच्या संयुक्त विद्यमाने शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दि.13 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11:00 वा. द्वितीय पदवी दिक्षांत समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रो.बालासाहेब ढेंबरे हे राहणार आहेत. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ. नारायणराव बोराडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर विशेष उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आणि नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव पा. चव्हाण, संस्थेचे सचिव प्रा. रविंद्र पा. चव्हाण हे राहणार असून पदवी वितरण समितीचे सदस्य सचिव प्रा.डॉ. सानप एन पी यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहेत.यावेळी संस्थेचे जेष्ठ व अनुभवी संचालक केशवराव पा. चव्हाण, संचालक माधवराव बेळगे, प्राचार्य.डॉ. मारूती माने (अध्यापक महाविद्यालय . नायगांव ) प्राचार्य विशाल क्षीरसागर ( डी. फार्मसी कॉलेज नायगांव ) प्राचार्य केशवराव सुर्यवंशी ( जनता माध्य व उच्च माध्य विद्यालय नायगांव बा) मुख्याद्यापक गंगाधर चव्हाण ( जनता प्राथमिक शाळा नायगांव बा) संगीत शिक्षिका सौ. उप्पलवार मॅडम, क्रिडा शिक्षक व लेझीम पथकाचे प्रमूख सय्यद आयुब यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे. तरी 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये शरदचंद्र महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण केली आहे त्यांनी पदवी प्रमाणपत्र धारण करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रो. बालासाहेब ढेंबरे यांनी केले आहे.
COMMENTS