केज / प्रतिनिधी विजयादशमी उत्सवानिमीत्त केज शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने वाद्यांच्या गजरात पथसंचलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्स...
केज / प्रतिनिधी
विजयादशमी उत्सवानिमीत्त केज शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने वाद्यांच्या गजरात पथसंचलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.
केज शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयापासुन पथसंचलनाला सुरुवात झाली .धारुर रोड येथील तुळजाभवानी चौकात संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन माळीगल्ली, राममंदीर,येथुन मंगळवार पेठेतील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्तंभाला पुष्पहार अर्पण करुन छञपती संभाजी महाराज चौकाला पुष्पहार अर्पण करुन केज शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन वकीलवाडी हनुमान मंदीराच्या प्रांगणात आल्यानंतर प्रार्थना होऊन पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.यावेळी केज शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते .
COMMENTS