*आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत केज येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश...!*

"भाजपा च्या विद्यमान शहराध्यक्षा सह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा शिवसंग्राममध्ये प्रवेश"  *केज रमेश इतापे* :--- शि...


"भाजपा च्या विद्यमान शहराध्यक्षा सह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा शिवसंग्राममध्ये प्रवेश"


 *केज रमेश इतापे* :--- शिवसंग्राम पक्षसंघटना विस्ताराचे धोरण सध्या शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकरावजी मेटे साहेब यांनी सुरु केले असून, जिल्हाभरात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. युवकांचा विकास, महिलांचे सक्षमीकरण, स्वछता, पायाभूत सुविधांमध्ये विकासात्मक काम करण्याचे प्रभावी धोरण आ.विनायकरावजी मेटे साहेब करत असल्याचे बीड जिल्ह्यातील अनेक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ओळखले आहे. जिल्ह्यातील विविध स्तरातील, जातीधर्मातील युवकांना आ.विनायकराव मेटे यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे.

      केज तालुक्यातील भाजप शहराध्यक्षांसह अनेक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शनीवारी केज येथील विश्रामग्रहात शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला.यामध्ये विद्यमान भाजप शहराध्यक्ष प्रकाश अंबादासराव गुंड, शेतकरी कामगार पक्षाचे नेते शामराव शिवाजीराव चिंचोलीकर, काँग्रेसचे नेते अझीम नजीमुद्दीन इनामदार, लक्ष्मीकांत सुभाष गाढवे, सुजय विजय चिंचोलीकर, किरण नंदकुमार तांबवेकर, शुभम मारुती गंभीरे, सय्यद हैदर सय्यदअली, गुड्डू शेख बाबा, शिवाजीराव डोंगरे, सुंदर राव जाधव, सुनील बोरगावकर, अरुण थळकरी, अहमद शेख, संतोष पवार, लक्ष्मण आकुसकर, सैफुद्दीन इनामदार, बाबा काळे, शेख निजाम, विनोद आगलावे यांच्यासह अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनीही शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश केला.

        यावेळी बोलताना आ. मेटे यांनी सांगितले की,शिवसंग्राम महाराष्ट्रामध्ये सांस्कृतीक, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहे. आज शिवसंग्राम सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली आहे तसेच शिवसंग्राममध्ये सर्व जातीधर्माचे पदाधिकारी,कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत भविष्यात शिवसंग्राम पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा यामध्ये आपली ताकत दाखवेल तसेच गोरगरीब, दीन- दलित, वंचित, गरजवंताच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिवस- रात्र परिश्रम करेल. पुढे बोलताना ते म्हणाले की,शिवसंग्राम संघटनेचे काम करत असतांना शिस्त पालन होणे आवश्यक आहे,येत्या काळात नगरपालिका,नगरपंचायत,पंचायत समिति व जिल्हा परिषद काबीज करणे हे लक्ष्य आपल्यासमोर आहे हे गृहीत धरून कामाला लागले पाहिजे, जास्तीत जास्त जनतेपर्यंत तुम्ही पोहोचा व शिवसंग्राम संघटनेचे विचार व उद्देश साध्य करा. तसेचविजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवसंग्राम गावागावात, घरोघरी प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचविण्याचे बळ तुम्हाला मिळो अशा शब्दात यावेळीआ. मेटे यांनी शुभेच्छा दिल्या.

   याप्रसंगी केज तालुका प्रमुख केशवराव कदम, माजी तालुकाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते लिंबराज वाघ, जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी साक्षीताई हांगे, केज तालुकाध्यक्ष, महिला आघाडी तेजश्रीताई खामकर, गणेश खांडेकर, दीपक कोल्हे व अनेक शिवसंग्रामचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group