*मुंबई*- प्रत्येकाला मन असते ते संकुचित असता कामा नये . हे चांगले वैचारिक संचित आहे . ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा . पुस्तक ,ग्रंथ हा मित्र आयुष्यभर जवळ ठेवून वणे महत्वाचे असते . पुस्तकांमुळे प्रगति जिज्ञासा दुसऱ्यांचे भले करण्याची सकारात्मक दूष्टी मिळते . असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या कोकण विभागिय उपाध्यक्षा , हेटकरी मासिकाच्या संपादिका डॉ. अलका नाईक यांनी शीव शिक्षण संस्था संचालित डी.एस.हायस्कूलच्या आँनलाईन वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने झूम दूरदूश्य प्रणालीवर केले .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष , श्री .राजेंद्र प्रधान , शाळेचे मुख्याध्यापक , श्री. विष्णू सरवळे पर्यवेक्षक श्रीमती संगिता खरे , श्रीम. शुभांगी गायकवाड, श्रीम. कल्पना पाटिल व श्री बळवंत ढेकळे आदि मान्यवरांसह कार्यक्रम प्रमुख श्री.दिलीप पारधे ,शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व पालक उपस्थित होते .
राजकिय ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील महनीय व्यक्ती आपल्याला त्यांच्या वैचारिक भूमिका आणि विचारांचे मार्गदर्शन करीत असतात . यात प्रत्येक व्यक्तीस चांगले मार्गदर्शनपर मित्र म्हणून पुस्तक अथवा ग्रंथाकडे पहावे लागेल . जेष्ठ वैज्ञानिक दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची आयुष्याच्या संध्याकाळी किती मालमत्ता अथवा जंगम संपत्ती होती . याचे उत्तर नाही येते .पण त्यांची ग्रंथसंपदा विपुल आणि मोठी होती त्यांच्या मूत्यूनंतर जगासमोर आले आहे . याचे स्मरण डॉ. अलका नाईक यांनी करुन दिले . आपण काय वाचतो आणि कस ते आत्मसात करून त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसा करु शकतो यावर अनेक उदाहरणासह आपल्या भाषणात करवून दिला .
यावेळी शाळेतील इयत्ता आठवी ,नववीच्या विद्यार्थ्यांनी . वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपली मनोगते , कविता ,डॉ. कलाम यांच्या अग्निपंख चरित्रातील उताऱ्यांचे अभिवाचन केले . या आँनलाईन झूम दूरदूश्य प्रणालीवरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी पूर्वा पवार हीने केले तर शाळेच्या शिक्षिका वंदना म्हात्रे यांनी करवून दिला . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सरपोतदार ग्रंथालयाच्या ग्रंथपाल , श्रीम .मनिषा कडव यांनी मेहनत घेतली .
COMMENTS