केज प्रतिनिधी तालुक्यातील जवळबन येथील रहिवासी अविनाश हरिभाऊ करपे यांची शिवसेनेच्या केज तालुका उपप्रमुख पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र के...
केज प्रतिनिधी
तालुक्यातील जवळबन येथील रहिवासी अविनाश हरिभाऊ करपे यांची शिवसेनेच्या केज तालुका उपप्रमुख पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र केज येथील बैठकीदरम्यान जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
अनेक वर्षापासून कट्टर शिवसैनिक म्हणून अविनाश करपे हे काम करत आहेत उपतालुका प्रमुख पदी निवड करून त्यांच्या कामाला न्याय मिळाला असल्याच्या भावना तालुक्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
यापुढेही पक्षवाढीसाठी सक्रिय राहणार असल्याचे मत करपे यांनी व्यक्त केले.
या निवडीबद्दल
निलेश करपे,तानाजी शिंपले ,महादेव करपे,हरिश्चंद्र करपे, दत्ता भाकरे,भाऊसाहेब करपे,बंडू गायकवाड,सुग्रीव करपे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत
COMMENTS