केज येथे बंसल क्लासेसचा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ
केजला शिक्षणाची पंढरी निर्माण करू - हारूणभाई इनामदार
केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचा इतिहास हा तसा संघर्षाचा राहिलेला आहे. या जिल्ह्याने संघर्षातून बरच काही मिळवलं आहे. राज्यातील आघाडी सरकार हे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी व या भागातील विविध घटकांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीड जिल्ह्याचा पॅटर्न हा वेगवेगळ्या क्षेत्रात दिसून येत आहे. शिक्षण क्षेत्रात सुद्धा बीड जिल्ह्याचा वेगळा पॅटर्न निर्माण व्हावा अशी अपेक्षा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केज येथे जिवन शिक्षण परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बंसल क्लासेसच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आ.संजयभाऊ दौंड हे होते. तर उद्घाटक म्हणून ना.धनंजय मुंडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.पृथ्वीराज साठे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, शिवाजीराव सिरसाट, धारूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ईश्वर मुंडे, चंदुलाल बियाणी, बांगड सर, माजी नगरसेविका सिताताई बनसोड, भाई मोहन गुंड, व्याख्याते अविनाश भारती, प्रा.विष्णु घुगे, नंदकिशोर मोराळे, प्रा.हनुमंत भोसले, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, अंकुशराव इंगळे, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चौरे, केजचे गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांच्यासह इतर मान्यवर व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री ना.धनंजय मुंडे म्हणाले की, आज बदलत्या काळामध्ये शिक्षण प्रणाली सुद्धा बदलली आहे. पुर्वीचे शिक्षण व पुर्वीचे शिक्षण पद्धती ही आज राहिलेली नाही. आमच्यावेळी इयत्ता 10 वी, 12 वी याला अधिक महत्व होते. आता त्याला महत्व राहिले नाही. 12 वीत 99.99 टक्के एवढे गुण घेतले तरी त्याचा काही एक उपयोग होत नाही. तर अभियंता होण्यासाठी जे.ई.ई. किंवा डॉक्टर होण्यासाठी नीटची परिक्षा द्यावी लागते व त्यात चांगले गुण घेवून आपले ध्येय व स्वप्न पुर्ण करता येते. परंतु हे करत असताना केलेला अभ्यास वाया जात नाही. त्यामुळे अभ्यासाच्या विषयीची गोडी लागते. आणि त्या निमित्ताने निर्माण झालेली रूची ही भविष्यात कामाला येते. केज शहरात हारूणभाई इनामदार यांनी बंसल क्लासेस सुरू करून या भागातील विद्यार्थ्यांना अद्यायावत व परिपुर्ण शिक्षणाचे दालन सुरू केले आहे. बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांची आहे. परंतु ही ओळख मिटविण्याचे काम जिल्ह्यातील तमाम तरूण करित आहेत. एम.पी.एस.सी. असेल किंवा यु.पी.एस.सी. असेल यामध्ये जिल्ह्यातील तरूणाई यशस्वी होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. तरूणामध्ये संघर्षाची तयारी आहे. परंतु त्यांना योग्य व खर्या मार्गदर्शनाची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रात बीड जिल्ह्याचा वेगळा पॅटर्न निर्माण व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय बीड जिल्ह्यात बंसल क्लासेसने पाय ठेवले. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना एन.सी.ई.आर.टी. अभ्यास हा पाचवी पासून करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होणार आहे. चंदुलाल बियाणी यांच्या माध्यमातून शिक्षणाची ही चळवळ बीड जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यामुळे मी चंदुलाल बियाणी, हरूणभाई इनामदार व त्यांच्या सर्व सहकार्याची अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो. सध्या सर्वत्र अनलॉकचा काळ सुरू आहे. आज शिकवणी सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली नाही. परंतु दिवाळी नंतर हे चित्र स्पष्ट होवून विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी परवानगी मिळेल असे दिसते आहे. कारण राज्य सरकार यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यासरकारच्या सामाजिक न्याय व विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यात बार्टी व सारथीचे केंद्र आणले जाणार आहे. त्या माध्यमातून अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मदत होणार आहे. हरूणभाई इनामदार यांनी या परिसरामध्ये शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून चांगले काम उभे केले आहे. त्यांच्या कार्याला आमच्या सदैव शुभेच्छा आहेत. बीड जिल्हा हळुहळु आपली नवी ओळख निर्माण करीत आहे. शिक्षणातून नवी ओळख निर्माण झाली तर हा बीड जिल्ह्याचा शैक्षणिक पॅटर्न मानला जाईल. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
तर हारूणभाई इनामदार बोलताना म्हणाले की, केज शहराची जुनी ओळख मिटवून नवी ओळख मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे.कारण या भागातील गोर-गरीब व सर्वसामान्यांच्या मुलांना जे.ई.ई. किंवा नीट परिक्षे संदर्भातील एन.सी.ई.आर.टी.चा अभ्यास करण्यासाठी किंवा शिकवणीसाठी लातूर,औरंगाबाद, पुणे, मुंबई व इतर महानगरामध्ये जाणे परवडत नाही. किेंवा त्यांची तशी आर्थिक क्षमता नाही. म्हणून या भागातील विद्यार्थ्यांना केज येथेच कोटा राजस्थान येथील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्गाच्या बुद्धी कौशल्यातून शिकविण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचा लाभ पालकांनी घ्यावा केज शहरात बंसल क्लासेस सुरू व्हावेत यासाठी माझ्या विनंतीला चंदुलाल बियाणी, बद्रीनाथ बाहेती, कैलास घुगे सर,कादरी सर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी साथ दिली. त्यामुळे केज शहरात शिक्षणाची पंढरी निर्माण करण्यासाठी कसलीही अडचण नाही. शिक्षणासोबतच या भागातील विद्यार्थी हा सुसंस्कारीत आणि चांगला नागरिक म्हणून त्याची ओळख व्हावी यासाठी आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी इनामदार यांनी पालकमंत्री यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करताना सांगितले की, केज शहर हे तसे खुप छोटे गाव आहे. या गावाच्या समस्या व अडचणी मोठ्या नाहीत आपण मनावर घेतले. तर या भागातील अडचणी चुटकी सरशी सुटू शकतात. त्यामुळे पालकमंत्र्यांनी केज शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मदतीचा व सहकार्यांचा हाथ पाठीवर ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात आ.संजय दौंड, व्याख्याते अविनाश भारती यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांगड सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन शिक्षण परिवार, बंसल क्लासेसचे सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोषीतून हजारो विद्यार्थी, पालक, गुरूजन वर्ग व वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक, बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS