नांदेड : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात शांततेने होणार्या शेतकरी आंदोलनात भरधाव कार घुसवून चार शेतकऱ्यांसह आठ जणांचे जीव घेणाऱ्या व शेतकरीविरोधी भूमिका घेणार्या भाजपा सरकारच्या विरोधात पुकारलेल्या आजच्या बंदमध्ये सर्व घटकांनी सहभागी होऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे
शेतक-यांच कोणतंही आंदोलन बदनाम करून ,दिशाभूल करून वेगवेगळ्या माध्यमांतून मोडीत काढण्याची काम भाजपा सरकारने सातत्याने केले . उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात झालेल्या प्रकाराने तर कहरच केला आहे. शांततेच्या मार्गाने जात असलेल्या शेतकर्यांना केंद्रात मंत्री असलेल्या नेत्यांच्या मुलाने कार घालून चार शेतकर्यांना चिरडले त्यात आठ जणांचे प्राण गेले. तरीही भाजपा सरकार अशा नेत्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे अशा शेतकरीविरोधी मानसिकतेचा निषेध करून शेतकर्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला नांदेड जिल्ह्यात पाठींबा देऊन सर्वांनी बंदमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केले
COMMENTS