नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने तब्बल आठ महिने उशिरा शेतकर्यांना एफआरपी रक्कम दिली. केवळ मुद्दल एफआरपी रक्कम शेतकर्यांना देऊन चालणार नाही तर उशीरा दिलेल्या एफआरपीचे व्याज सुद्धा भाऊराव कारखान्यांने पाहिजे यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीच नियमानुसार विलंब व्याजाचे पैसे शेतकर्यांना देण्यासाठी कारखान्याला निर्देशित करावे पालकमंत्र्यांच्या आधिपत्याखालील कारखान्यानेच कायदा मोडला तर आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.
ऊस गाळपाला गेल्यानंतर चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे असा कायदा असताना बहुतांश साखर कारखाने शेतकर्यांच्या अज्ञानाचा व मजबुरीचा गैरफायदा घेऊन मनमानी पध्दतीने आले तसे शेतकर्यांना पैसे देत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे भाऊराव चव्हाण कारखान्याने तब्बल आठ महिने उशिरा शेतकर्यांना पैसे दिले त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे . तरीही कारखान्याचे काही अंधभक्त आमच्या साहेबांनी शेतकर्यांना पैसे दिले म्हणून शेखी मिरवत आहेत. साहेबांना एवढीच शेतकऱ्यांची काळजी असेल व कायद्याचे पालन करावे असे वाटत असेल तर त्यांनी आठ महिने उशीरा दिलेल्या पैशांचे व्याज नियमानुसार शेतकर्यांना देण्यासाठी कारखाना प्रशासनाला निर्देशित करावे असे आव्हान प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे. शेतकर्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते उशिरा भरले तर व्याज सोडत नाही मग कारखान्याने आठ महिने उशीरा दिलेल्या पैशाचे व्याज शेतकरी का म्हणून सोडावे असा सवाल इंगोले यांनी उपस्थित केला कायद्यानुसार होणारे व्याज शेतकर्यांना नाही दिले तर पुन्हा उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व बारव कारखाना प्रशासनाला दिला आहे
COMMENTS