केज रमेश इतापे
केज तालुक्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून सतत अतीवृष्टी होत आसून अतीवृष्टीमुळे शेतकर्यांनी घाम गाळून पिकलेल्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी केज तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई ताबडतोब देण्याची मागणी केज
तालुका शिवसंग्राम अध्यक्ष केशव आप्पा कदम यांनी केली आहे.
यावर्षी अगोदरच शेतकरी कोरोना, लाॅकडाऊण मुळे आडचणीत आला आहे.त्यात केज तालुक्यात मागील दहा ते बारा दिवसापासून पावसाने कहर केल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आसून तहसीलदार केज यांनी सबंधित विमा कंपन्यांना आदेश देऊनही विमा कंपन्याकडून शेतकर्यांना आगाऊ विमा भरपाईची रक्कम दिली जावी अशी मागणी करण्यात आली.त्यात पुन्हा दहा ते बारा दिवसापासून केज तालुक्यात पावसाने कहर केला आसून सोयाबीन,कापूस,बाजरी,ऊस,कांदा ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच नद्यांना महापूर आल्याने जमिनी वाहून गेल्या आहेत.तर काही ठीकाणी शेतकऱ्यांचे घरे देखील कोसळून भुईसपाट झाले आहेत.तसेच काढून टाकलेले सोयाबीन कुजून गेले आहे.त्यामुळे शेतकर्यांना अशा कठीण काळात राज्य सरकारने शेतकर्यांना तात्काळ सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत करण्याची मागणी शिवसंग्राम केज तालुका अध्यक्ष केशव आप्पा कदम यांनी केली आहे.
COMMENTS