समाजाने कायद्याचे तंतोतंत पालन करावे ------ सहन्यायाधीश डोरनापल्ले

 नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )      भारतीय कायदा हा प्रत्येक घटकासाठी समान असून यात कुठलेही वेगळे पण नाही, सर्व जाती धर्मासाठी ...


 नायगांव / प्रतिनिधी

( रामप्रसाद चन्नावार )

     भारतीय कायदा हा प्रत्येक घटकासाठी समान असून यात कुठलेही वेगळे पण नाही, सर्व जाती धर्मासाठी समान आहे, आपण कसलाही गैरसमज न करता समाजाने कायद्याचे तंतोतंत पालन करावे असे प्रतिपादन सह न्यायाधीश जी. एस. डोरणापल्ले यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

    तालुक्यातील मौजे मांजरम येथे कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तालुका विधी सेवा समिती अभी वक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारत की आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या वेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी नायगांव दिवाणी कनिष्ठ स्तराचे सह न्यायाधीश जी.एस. डोरणापले तर अँड. बी एम वाघमारे,एल.एस. तुमेदवार, एन. आर. देशपांडे, अँड जाधव, विधी स्वयंसेवक रवींद्र भालेराव, वरिष्ठ अधिकारी सारंगे, अँड. एस. एम. मांजरमकर, यांची प्रमुख उपस्थिती होती, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत की आजादी अमृत महोत्सव 2 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर कायदेविषयक जनजागरण शिबीर आयोजित करण्यात आले असून यात स्त्रियांचे हक्क, बालकांचे हक्क,एफ आर बद्दल प्राथमिक माहिती, शेती विषयक कायदे स्त्रियांचे लैंगिक मानसिक व शारीरिक छळ याविषयी अभी वक्ता संघाने मार्गदर्शन केले आहे.

  आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री डोरणापल्ले बोलतांना पुढे म्हणाले की, अपराध करणाऱ्या पेक्षा अपराध शोषण करणारा गुन्हेगार असतो तेव्हा कायदा समजून घेणे व कायद्याच्या बाजूने उभे राहून न्याय घेणे, आणि कायद्याचे तंतोतंत पालन करणे हे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी तंटामुक्ती उपाध्यक्ष संभाजी पाटील शिंदे, शाहीर सूर्यकांत शिंदे, साहेबराव जाधव, विनायकराव पा शिंदे, जिल्हा परिषदेचे शिक्षक वृंद उबाळे, गायकवाड, मुंडकर यासह मारोतराव कोंडामंगल ,प्रल्हाद पाटील शिंदे ,बालाजी माली पाटील, पद्माकर पांचाळ, सरपंच प्रतिनिधी श्रीकांत मांजरमकर, भानुदास पाटील शिंदे, गजानन शिंदे यासह गावातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपत पाटील शिंदे यांनी केले तर सर्वांचे आभार आनंदराव कांबळे यांनी मानले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group