नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांची आगामी २०२१ - २२ या शैक्षणीक वर्षाची सर्व अभ्यास क्रमाची काॅलेज, महाविद्यालय , विद्यापीठाची सर्व शैक्षणीक फिस व परिक्षा फिस माफ करून विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावे. या मागणीसाठी दि १६ ऑक्टोंबर रोजी पवन जगडमवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत यांना मेल पाठवून मागणी केली.
मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी मुळे पुर परिस्थिती निर्माण झाली.त्यात शेतकऱ्यांचे अंतोनात नुकसान झाले. ऐन काढणीच्या तोंडावरच पावसाची सतंतधार सुरू राहील्याने मुंग ,उडिद , सोयाबीन पिके शेतातच मोड उठून पडून खराब झाले तर अनेकांच्या शेतालाच तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले होते.नदी काठच्या तर जमिनीच पुराच्या पाण्यात खरडून गेल्या त्यामुळे शेतातील माती देखील वाहून गेली. आत्ता या शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला असताना उरल सुरल शेवटच पीक समजल जाणारे तुरीचे पीक देखील पिवळे पडून वाळून जात आहे.तर कापूस पिकांवर लाल्या रोग पडलाय यामुळे शेतकरी हवालदिल झालाय बँके कडून कर्ज काढून शेती करणारा शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडला असल्याने यंदा तो आपल्या मुलांची शैक्षणीक फिस देखील भरू शकत नाही.
यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुल शैक्षणिक फिस व परिक्षा फिस भरू न शकल्यामुळे शिक्षणा पासून वचिंत राहतील किंवा आत्महत्या करतील याची सरकारने वाट पाहू नये. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत यांनी तात्काळ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांची यंदाची काॅलेज, महाविद्यालयाची, विद्यापीठाच्या सर्वच अभ्यास क्रमाची शैक्षणीक फिस व परिक्षा फिस माफ करून विद्यार्थांना मोफत बस पास देऊन शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय द्यावे.अशी मागणी पवन जगडमवार यांनी मेल पाठवून मागणी केली. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत हे या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देतील का ? याकडे आत्ता सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS