नांदेड.(विशेष प्रतिनिधी) मुसलमानवाडी पाटी परिसरातील लव्ह 'बर्ड' कॉफी शॉपमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या एका जोडप्याला संबंधित कॉफीशॉपच्या मालकासह इतवारा उपविभागीय दामिनी पथक व नांदेड ग्रामीण ठाण्यातील डीबी तथा गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. ही घटना आठ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आहे.
नांदेड 'ग्रामीण' पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'मुसलमान'वाडी पाटी परिसरात विनापरवाना "कॉफी" शॉप सुरू असल्याची खात्रीपूर्वक माहिती ८ ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळाली. उपरोक्त खात्रीशीर माहिती समजताच प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली 'डी. बी'. अर्थातच गुन्हे शोध पथकातील सपोनि. संकेत दिघे, पोलीस नाईक प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, पो.कॉ. विश्वनाथ पवार तसेच इतवारा उपविभागाच्या 'दामिनी' पथकाच्या प्रमुख पोउपनि. पी. आर. बाभळे आणि त्यांच्या सहकारी महिला पो.कॉ. उज्वला दिग्रसे तसेच पोलीस नाईक राजेश माने आदींनी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी मुसलमानवाडी पाटी भागातील 'लव्ह' बर्ड या नावाच्या कॉफी शॉपवर धाड टाकली.
विशेष बाब म्हणजे, इतवारा उपविभागीय दामिनी पथक आणि ग्रामीण पोलिसांनी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी बारावाजेचेदरम्यान, मुसलमानवाडी पाटी येथील 'लव्ह' बर्ड कॉफीशॉपवर टाकलेल्या धाडीदरम्यान, 'कॉफी'शॉपमधील एका खोलीत एक मुलगा आणि एक मुलगी अश्लिल कृत्य करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी, पोलिसांनी उपरोक्त 'कॉफी'शॉपचे मालक सुनील मुकींदराव बेरूळकर (रा. चौफाळा, नांदेड) यांच्यासह लव्हबर्ड या कॉफी शॉपमध्ये अश्लिल कृत्य करणाऱ्या त्या जोडप्याला ताब्यात घेवून नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आहे. त्याचवेळी, ग्रामीण ठाण्यात त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्र. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली आहे.
COMMENTS