----------------------------------------
महिला बचत गटांना सवलतीच्या दरात गिरण्यांचे वाटप
----------------------------------------
नांदेड- नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई कल्याणकर या नेहमीच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यांनी 7 रोजी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत महिला बचत गटांना सवलतीच्या दरात विविध गिरण्यांचे वाटप केले आहे.
शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या सौ. संध्याताई कल्याणकर यांनी मतदार संघातील गावांमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे कुटिर उद्योग सुरु करण्यास प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. हळदी, चटणी, मसाला, पापड यासह शिवणकाम, विणकाम नक्षीकाम अशा कौटुंबिक व्यवसायासाठी त्यांनी महिलांना मार्गदर्शन आणि सहकार्य केलेले आहे. यातून ग्रामीण भागातील महिला स्वतःचा वेगळा व्यवसाय उभारून सक्षम होत आहेत. नांदेड उत्तर भागामध्ये सौ. संध्याताई कल्याणकर यांच्या पुढाकारातून अनेक बचत गट निर्माण झाले आहेत. या बचत गटातील महिला उपेक्षित वंचित कुटुंबातील असून या महिलांसाठी अत्यंत कमी किमतीत शिलाई मशीन, पापड मशिन, चटणी- हळद कुटणे मशीन आदी वेगवेगळ्या 27 प्रकारच्या गिरण्याचे वाटप शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत केले. सौ. संध्याताई कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष सौ. राजश्रीताई पाटील यांच्यासह मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS