प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरूवारी सकाळी अचानक हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याला भेट दिली होती. पोलिस अधिक्षक यांच्या सरप्राईज व्हिजीटने ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसुन आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी ठाण्यातील प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेतला. तसेच तात्काळ गुन्हे निकाली काढण्याच्या सुचना ठाणेदार व जमादारांना दिल्या. ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची गोपणीय माहीती काढून कारवाई करण्याचे आदेश यावेळी कलासागर यांनी ठाणेदार व बिटजमादारांना दिले होते. मात्र पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाला काही बिटजमादाराकडुन केराची टोपली दाखवीत बिटमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याकडे कानाडोळा करत असल्याची बाब समोर आली असुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवघ्या पाच दिवसात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत डिग्रस करहाळे बिट मध्ये दोन कारवाया केल्या आहेत. यामध्ये 3 आँक्टोबर रोजी ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील राहूली खु. परिसरातील नदी पात्रातुन वाळू ची अवैध वाहतुक व वाळू चोरी होत असल्याची माहीती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके यांनी छापा टाकुन एक ट्रँक्टर व वाळू असा 5 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर 8 आँक्टोबर रोजी लिंबाळा मक्ता येथे सुरू असलेल्या मटका जुगारावर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर जाधव, संभाजी लेकुळे, आकाश टापरे, पायघन, शेख जावेद यांच्या पथकाने छापा टाकुन नगदी 4 हजार 310, 15000 रुपायांचे मोबाईल, मटका जुगाराचे साहीत्य असा एकूण 19 हजार 310 रूपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाच दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने दोन कारवाया करण्यात आल्याने ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे एलसिबीच्या कारवाई ने समोर आले आहे.
COMMENTS