नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार ) भावजयी सोबत छेडछाड करणाऱ्या दिरास एक वर्षाचा सश्रम कारावास, सहा महिण्याची साधी कैद आणि पाच हजराच्या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायालयाचे दुसरे सह न्यायाधीश जी.आर. डोरनलपल्ले यांनी सुनावली आहे. सदर प्रकरणी नायगांव पोलीस ठाण्यात सन २०१६ रोजी गुन्हा नोंद झाला होता व या प्रकरणात दि.14 आक्टोबर रोजी निकाल लागला आहे.
नायगांव शहरातील बेळगे नगर येथे पिडीत महिला ही आपल्या पतीसह राहत होती पती फळाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करतो. पिडीत महिला ही गर्भवती असल्याने ती आपल्या घराचे छपरात आराम करत होती. दुपारी २ वाजताच्या दरम्यान आरोपी प्रकाश संभाजी गायकवाड हा नात्याने दिर असून तो तिथे आला एकटी असल्याने एकटेपणाचा फायदा घेत तिच्या अंगावर पडला व छेडछाड केली.अचानक असा प्रकार घडल्याने महिला घाबरली व तिने आरडाओरड केली असता आरोपीने पळ काढला. जाताजाता ही गोष्ट कुणाला सांगितलीस कि जीवे मारण्याची धमकी दिली होती.
महिलेच्या आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले असता पिडीतेने घडलेला प्रकार सांगितला. त्याचबरोबर महिलेचा पती वसंत गायकवाड यांनीही सदरची माहिती समजताच ते घरी आले. सदर प्रकरणी नायगांव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन १५ एप्रिल २०१६ रोजी ३५४,३२३ व ४०५ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उप निरिक्षक राहूल वाघ यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या प्रकरणात ८ साक्षीदार तपासण्यात आले असून यामध्ये पिडीत महिलेची साक्ष हा पुरावा महत्वाचा ठरला असून. फिर्यादी साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून २ रे सह न्यायाधीश जी.एस. डोरनलपल्ले यांनी प्रकाश संभाजी गायकवाड यास ३५४ खाली एक वर्ष सश्रम कैदेची शिक्षा, पाच हजाराचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, ५०६ प्रकरणी सहा महिण्याची साधी कैद आणि पाच हजाराच्या द्रव्य दंडापैकी ३००० पिडीत महिलेस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत.
COMMENTS