सोनपेठ/प्रतिनिधी
ट्रँक्टरसह पाच जण वाहुन गेलेल्या पुलावरील वाहणाऱ्या पाण्यात बसुन रस्त्याविना त्रस्त नागरीकांनी आंदोलन केले.सोनपेठ तालुक्यातील शेळगाव-उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीच्या लहान पुलावरुन नेहमीच पाणी वाहते.या पुलावरुन पाणी गेल्यास गोदाकाठच्या अकरा गावांचा संपर्क तुटतो.या रस्त्यासाठी नागरीकांनी अनेकदा आंदोलने केली.विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार पण घातला होता.दि.१७ रोजी रात्री साठे आठच्या सुमारास एका ट्रँक्टरमध्ये बसुन पाच जण जात असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला व ट्रँक्टरची ट्रॉली उलटल्याने ट्रँक्टर हेडसह नदीत उलटले व सहाही जण जाऊन झुडपांना अडकले.शेळगाव येथील नागरीकांनी या पाचही जणांंना दोरखंडांच्या सहाय्याने बाहेर काढले.सातत्याने पुलावर पाणी येऊन नागरीक जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडत असल्याने या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१८ रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदु यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे,अनिल रोडे,सोमनाथ नागुरे यांच्यासह गोदाकाठच्या नागरीकांनी पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात बसुन आंदोलन केले.यावेळी महिला व रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरीकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह शेळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे,नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्विकारले.
फोटो:-फाल्गुनी नदीच्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात बसुन शेतकरी संघटनेच्या सुधीर बिंदु व सहकाऱ्यांनी आंदोलन केले.
COMMENTS