महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती नांदेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे *राज्याध्यक्ष मा.नवनाथजी गेंड सर* यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला महाविद्यालय नांदेड येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
शिक्षक भारतीचे जिल्हा *कार्याध्यक्ष शिवाजी राठोड* यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातमध्ये वस्तीशाळा शिक्षकांच्या समस्या बाबत आपले मत व्यक्त केले तसेच संघटनेचे जिल्हा *उपाध्यक्ष जगजीतसिंग ठाकूर, मुदखेड चे तालुकाध्यक्ष शिवहारी खानसोळे सर, विजयकुमार पाटील, रामेश्वर गायकवाड, सुभाष जाधव पांचाळ सर* यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षक भारतीचे *राज्य प्रसिधिप्रमुख मा.चिमणाजी दळवी* सर यांनी संपूर्ण राज्याचा आढावा, वस्तीशाळा शिक्षकांचे योगदान,लढा, *मा. कपिलजी पाटील साहेबांची काम करण्याची पद्धत*, यावर सविस्तर मार्गदर्शन करून कपिल पाटील साहेब यांच्यामुळेच आपण आज शिक्षक असून आपली चूल पेटलेली आहे. *मा.कपिल पाटील साहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत व इतर कोणतीही संघटना आपल्यासाठी काही केलेली नाही व करणारही नाही त्यामुळे साहेबांच्या उपकाराची जाणीव ठेऊन सर्व वस्तीशाळा शिक्षकांनी साहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे शिक्षक भारती सोबत प्रामाणिक रहावे साहेबांना बेईमान होऊ नका* असे ठणकावून सांगितले.
*शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुणके* यांनी शिक्षकांचे जिल्हास्तरावरील व राज्यस्तरावरील प्रलंबित प्रश्न,संघटनेची बांधणी, शिक्षक भारतीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांची अनेक प्रश्न सोड विल्याबाबतचा आढावा व शिक्षक भारतीच्या वतीने राबविण्यात आलेले व राबविण्यात येत असलेले उपक्रम याबाबतचा आढावा राज्याध्यक्ष मा.नवनाथ गेंड सर यांना सांगितले.तसेच *काही शिक्षक संघटना ह्या मुंबईला जाऊन फोटोसेशन करतात व प्रश्न निकाली निघाला म्हणून विनाकारण बातम्या प्रसारित करतात व संपूर्ण राज्यातील शिक्षकांची दिशाभूल करतात तर राज्यावरून एखादा प्रश्न मा.कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून निकाली निघाला की आमच्या प्रयत्नाला यश म्हणून बातम्या प्रसारित करतात ही शोकांतिका असल्याचे म्हणाले* तसेच आमच्या नांदेड जिल्ह्यात शिक्षकांची अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असतात परंतु येथील *काही संघटना अधिकार्यांची चोचले गिरी करत त्यांचे व स्वतःचेच सत्कार करत सुटतात खूप वर्षांनी एखादा प्रश्न निकाली निघाला की आमच्या प्रयत्नाला यश आले म्हणून काहीजण व्हाट्सअप ,पेपरवर व मीडियावर बातम्या प्रसारित करण्याची चढाओढ लागते आणि पतपेढीच्या निवडणुकीच्या राजकारणापायी संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांची दिशाभूल करतात* हे कुठेतरी थांबले पाहिजे. *प्रत्येक टेबलवर छोट्या छोट्या कारणासाठी चिरीमिरीची सवय लागलेली असून संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक आज वेठीस धरला जात आहे* शिक्षकांची कोणतीच कामे सरळ व वेळेवर निकाली काढल्या जात नाहीत त्यामुळे या बाबतीत मा.कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांना नांदेडच्या गंभीर प्रश्नाबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करावी किंवा विधानसभेच्या कामकाजामध्ये स्वतंत्र नांदेड जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रश्न उपस्थित करावेत* अशी राज्याध्यक्ष यांना विनंती केलेली आहे.तसेच *जुनी पेन्शन योजना,पगार,बि.डी.एस.प्रणाली,बदल्या,पदवीधर वेतनश्रेणी,यासह इतर मागण्यांबाबत राज्यस्तरावर* सतत पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत विनंती करण्यात आली.
*राज्याध्यक्ष मा. नवनाथजी गेंड सर यांनी अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन केले* राज्यशासनाचे कोणतेही आदेश नसतांना *नांदेड जिल्ह्यातील चार वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मुख्याध्यापकांच्या मार्फत समाप्त केली असून ही फार गंभीर बाब आहे असे सांगून लगेच शिक्षणाधिकारी मा.दिग्रसकर साहेबांना फोन करून याची विचारणा केली असता त्यांनी राज्यशासनाकडे मार्गदर्शन मागितल्याचे सांगितले यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आमदार मा.कपिलजी पाटील साहेबंच्या मार्गदर्शनाखाली* शिक्षक भारतीच्या वतीने राज्यामध्ये आत्तापर्यंत किती मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात आले आणि किती प्रश्न मार्गी लागण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत याची सविस्तर माहिती सांगून *वस्ती शाळा शिक्षकांची जुनी सेवा (मूळ) धरणे व त्यांना पेन्शन लागू करण्याबाबतची फाईल अंतिम टप्यात असून मा.कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अगदी काही दिवसांमध्ये निकाली निघणार आहे* त्यामुळे वस्तीशाळा शिक्षकांनी आपापसातील भेदभाव, हेवेदावे विसरून इतर कोणत्याही संघटनेत न जाता कपिल पाटील साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी शिक्षक भारतीशी एकसंघ राहून आपला स्वतःचा प्रश्न मार्गी लावून घ्यावा वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न मा.कपिल पाटील साहेबांशिवाय इतर कोणीही सोडू शकत नाही आणि यापूर्वी सोडविलेला देखील नाही त्यामुळे सर्वांनी शिक्षक भारती सोबत प्रामाणिकपणे राहावे असे आव्हान केले.तसेच *शिक्षक भारती ही तळागाळातील वाडी वस्तीवरील शिक्षकांसाठी मैदानात उतरून काम करणारी संघटना असून आज रोजी राज्यात नंबर 1 ची शिक्षक भारती संघटना होण्याच्या मार्गावर आहे* अगदी कमी कालावधीत शिक्षकांची अनेक प्रश्न सोडविल्यामुळे शिक्षक भारती राज्यामध्ये नावारूपाला आलेली आहे आज *अनेक शिक्षकांचा मा.कपिल पाटील साहेबांच्या व शिक्षक भारतीच्या कामावर फार मोठ्या प्रमाणावर विश्वास निर्माण झालेला* आहे.आणि नांदेडच्या शिक्षक भारतीचे काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू असून मी या कामाबाबत समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केले व *नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्ना संदर्भामध्ये मा.कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मंत्रालयीन स्तरावर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याबाबत राज्याध्यक्ष यांनी आश्वासन दिले*
तसेच *नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये मा.कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडला फार मोठ्या प्रमाणात शिक्षक मेळावा आयोजित करणार असल्याचे* सांगून सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
या बैठकीचे सूत्रसंचालन शिक्षक भारती माध्यमिकचे *जिल्हाध्यक्ष संजय शेळके* सर यांनी केले तर आभार शिक्षक भारतीचे संघटक *मुकुंद जोशी* यांनी मानले.
शब्दांकन
*हनीफ शेख*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
*शिक्षक भारती नांदेड*
COMMENTS