सोनपेठ/प्रतिनिधी
शिवसेनेचे सोनपेठ तालुकाप्रमुख भगवान पायघन यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सोनपेठ तालुका शिवसेनेच्या वतीने शहरातील व्यापारपेठ बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
दि.१७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सोनपेठ शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाचे समोर उभे असणाऱ्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुख भगवानराव पायघन यांच्यावर अचानक गुंडाकडून हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात पायघन हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.याबाबत सोनपेठ तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.आज दि.१९ मंगळवार रोजी सोनपेठ शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे,तालुका समनव्यक रंगनाथराव रोडे,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,उपतालुकप्रमुख माणिक खरात,कुमार चव्हाण,संतोष धोंडगे,शिवसेनेचे जेष्ठ नेते रावसाहेब पांडुळे,रुस्तुम कलिंदर,अविनाश जाधव,संतोष गवळी,दीपक बाचाटे,जनार्धन झिरपे,रामेश्वर सोलापूरकर,अमोल दहिवाळ,शुभम सोन्नर,गणेश जोशी,माऊली कदम,रामेश्वर पोते,कैलास गिराम,नागनाथ शिंगाडे,बागुल शेख,शंकर शिंदे,भैय्या खरात,जगदीश स्वामी,नारायण रोडे,संदीप भिसे,विलास काटे,माणिक मोरे,अशोक रोडे आदी असंख्य शिवसैनिक,युवासैनिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS