नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
सामाजिक व राजकीय चळवळीतील सर्वदूर आपल्या प्रभावी वक्तृत्वाने प्रसिद्ध असलेले युवा नेतृत्व श्री.निळकंठ ताकबीडकर यांनी दि.१८ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्याचे युवा नेते आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.ताकबीडकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात परखड व वैचारिक दृष्टीकोन असलेला सहकारी मिळाल्याचा आनंद त्यांनी पक्ष प्रवेश सोहळ्या व्यक्त केला.
मा.निळकंठ ताकबीडकर हे महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवराय, फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत.वंचित आणि आंबेडकर परिवार यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रातील अल्प कालावधीत ओळख निर्माण केली होती.मागच्या काही काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर साहेब व तालुकाध्यक्ष भास्कर दादा भिलवंडे यांच्याशी जवळीक वाढल्याने त्याचा पक्ष प्रवेश झाल्याची चर्चा आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक कार्यध्यक्ष रविकांत वरपे,सभापती शिरीष गोरठेकर,प्रदेश सचिव नाना बोराडे, निशांत वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर ,युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका कैवारे,संतोष दगडगावकर,बालाजी पा. सांगवीकर ,नायगाव तालुका कमिटीचे श्याम पाटील चोंडे, गजानन पा. होटाळकर,माधव कोरे,संजय चव्हाण,माधव बेंद्रीकर यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS