सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथे ग्रामस्थांनी कोरोनावर मात करण्यासाठी माजी.जि.प.सदस्य तथा सरपंच दशरथ सूर्यवंशी-पाटील यांनी त्यांच्या पुढाकारातुन ग्रामस्थांना १००% लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त केले होते.यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.पवार यांच्या व सरपंच तथा माजी जि.प.सदस्य दशरथ पाटील सुर्यवंशी यांनी मोठे योगदान देत नरवाडी जिल्हा परिषदेच्या गटातील बहुतांश गावासह तालुक्यातील गावात लसीकरण करुन घेण्यासाठी प्रशासन व जनता यामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन सूर्यवंशी-पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.तालुक्यातील कोरटेक येथेही त्यांनी १००% लसीकरण करुन घेतले.यावेळी डॉ.रहमान खान,पंडित चव्हाण,आर.बी.सुर्यवंशी,बि.एम.मुंढे,आरोग्य सेविका,पि.व्ही.सोळंके,ग्रामसेवक रामकुमार पवार,देवयी जाधव,ललीता कदम,पुष्पा सुरवसे,नामदेव गायवळ,व गावातील सर्व नागरीक,युवक यांनी सहकार्य केले.
COMMENTS