सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील डिघोळ गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असून युवा नेते तथा उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत यापुढेही डिघोळ येथील विविध विकास कामे करण्यासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी ग्रामस्थांना दिले.१७ ऑक्टोबर रोजी डिघोळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्या हस्ते पार पडले.डिघोळ येथे पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून त्याच्या सभामंडपाचे काम वरपूडकर यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले तसेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापना करण्यात आली.यावेळी कार्यक्रमासाठी अंगद महाराज शिंगाडे,उपसरपंच अजयकुमार देशमुख,ग्रामपंचायत सदस्य भीमराव पारेकर,किरण गायकवाड,शिंदे,विलास शिंदे,वैभव खंदारे,प्रकाश चव्हाण,बाबुराव इंदूरकर,रमाकांत देशमुख,भास्कर बोकान,नबी साहाब,शरद मुळी,विनोद गायकवाड,विश्वनाथ चामे,रंजित देशमुख,गंगाधर शिंदे,प्रवीण पुरी, आकाश शिंदे,गणेश अन्नपूर्णे,गणेश शिंदे,गंगाधर शिंगाडे,गणेश शिंगाडे,शुभम गायकवाड,धनंजय चिंचाने व इतर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS