सोनपेठ/प्रतिनिधी
परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी हार,तुरे,सत्कार टाळून धार्मिक कार्यक्रमास अध्यात्मिक, सांप्रदायिक,साहित्यासह लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनानुसार परभणीचे त्यांचे कट्टर कार्यकर्ते तथा दशनाम युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्निल(भैय्या)भारती यांनी शहरातील गणेशनगर भागातील वारकरी सांप्रदायास भजन साहित्याचे वाटप करत वाढदिवसाच्या निमित्ताने एक आदर्श कार्य करत समाजासमोर उदाहरण ठेवले आहे.याप्रसंगी सदर साहित्याच्या वाटपाचा शुभारंभ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार माऊली महाराज खडकवाडीकर,गटनेते चंदू शिंदे,नगरसेवक सुशील कांबळे,गोसावी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.पी.एल.भारती,संभानाथ काळे,प्रा.शंकर पुरी,प्रकाश रेंगे,विशु डाहाळे,गणेश मुळे,अशोक खेडकर,आदींची उपस्थिती होती.दरम्यान केलेल्या या कार्याबद्दल भैय्या भारती यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
COMMENTS