स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत अनेक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठास रोपटी भेट स्वरुपात दिलेली आहे. त्याचबरोबर स्वत: वृक्ष लागवडीसाठी उपस्थित राहून ‘ग्रीन युनिव्हर्सिटी क्लीन युनिवर्सिटी’ या प्रकल्पामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहेत.
आज दि. २ ऑगस्ट, रोजी विद्यापीठ परिसरातील बॉटनिकल उद्यानामध्ये ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यापैकी प्रा. डॉ. कृष्णामाचारेलू यांनी १५० वृक्ष, क्रिडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी ५० वृक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी ५० वृक्ष तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी ५० वृक्षांची भेट दिली. सदर रोपटे या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित लावण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही.व्ही. मोरे, सहा. कुलसचिव रामदास पेदेवाड, पांडुरंग सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

COMMENTS