नवीन नांदेड: नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील कुसुमताई माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक अर्जुन रामकिशन गुंडाळे हे प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले असून, यानिमित्ताने त्यांना १ ऑगस्ट रोजी शाळेच्या वतीने आयोजित एका समारंभात निरोप देण्यात आला आहे.
नवीन नांदेडातील मंगल कार्यालयात रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास फुलारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंचावर प्रसिद्ध कथाकार दिगंबर कदम, संस्थेचे सचिव संभाजीराव बिरादार, सहसचिव शशिकलाताई बिरादार, मुख्याध्यापक के. ए. जोशी, प्रा. एस. डब्ल्यू. कुलकर्णी, व्ही.एस. पाटील, राजश्रीताई पाटील व रत्नमाला अर्जुनराव गुंडाळे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक उज्वला सावते यांनी, तर सूत्रसंचालन शेख निजाम गवंडगावकर व स्वाती चावरे यांनी केले. दिगंबर शिंदे यांनी कलाअध्यापक ए. आर. गुंडाळे यांच्या 'सन्मान'पत्राचे वाचन केले, तर विश्वास हंबर्डे यांनी मान्यवर-उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक विलास बिरादार, मेरवान जाधव, नरसिंग यरमलवाड, सूर्यकांत वडजे, युवराज शिंदे, अंगद केंद्रे, अरविंद राठोड, बाबूराव वाडेवाले व एन.जे. शेख यांच्यासह भाग्यश्री अमोल पोकळे, धनश्री बालाजी कामाजी, विजयश्री शिवकुमार शक्करवार, अंबिका पांडुरंग सोमावार व ऋषिकेश गुंडाळे आदींनी परिश्रम घेतले.



COMMENTS