नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको-हडको' परिसरात एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून, यानिमित्त ठिक-ठिकाणी बहुजन
समाजबांधवांच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी,नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाच्या प्रांगणात सहाय्यक पो.नि.
सुरेश थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा 'दलित'मित्र माधवराव आंबटवार, नारायण कोलंबीकर, जी. सी. मेकाले, डी. एम. बुजवणे, मेजर हरिश्चंद्र गोपले, उत्तमराव घोडजकर, गंगाधरराव वाघमारे, के.एल. ढाकणीकर, एकनाथ वाघमारे, निवृतीराव कांबळे, राजू लांडगे, विलास गजभारे, सतिश बसवदे, प्रमोद मैड, निवृतीराव जिंकलवाड, भिमराव जमदाडे, प्रा. इरवंत सुर्यकर, विनोद सुत्रावे, संदीप जिल्हेवाड, पेंटर श्रीरंग खानजोडे, आनंदा वाघमारे, किशन वाघमारे, मरीबा बसवंते, नितीन वाघमारे, जगदीश भुरे, एस. पी. कुंभारे, शेषेराव कांबळे, भिमराव जमदाडे, शाहीर गौतम पवार, राजेश बोराळे, प्रा.शशिकांत हटकर, सूर्यकांत गायकवाड व शामराव सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, नगरसेविका बेबीताई गुपिले तसेच माजी नगरसेविका डॉ. करूणाताई जमदाडे यांच्यासह लक्ष्मीबाई सूर्यवंशी, प्रेमला गोपले, मधू डोम्पले, लताबाई फुले, जनार्दन गुपिले, सहाय्यक पो.नि. सुरेश थोरात, पोउपनि. गणेश होळकर, देविदास सूर्यवंशी, संजय पाटील घोगरे, नरसिंगराव दरबारे, बी.डी. कांबळे, सुरेश गजभारे, विठ्ठल गायकवाड, साहेबराव भंडारे तसेच साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजबांधवांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले आहे.

COMMENTS