सोनपेठ/प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती सोनपेठ व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित महालोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाची अनुक्रमे ९३ व१०५ प्रलंबीत प्रकरणे तडजोडी करता ठेवण्यात आले होती.त्यापैकी दिवाणी स्वरुपाची १२ व फौजदारी स्वरुपाची ०४ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आलीत.१३८ एन.आय.अँक्टच्या निकाली प्रकरणामध्ये रक्कम रुपये १,३८,५०५ वसूल करण्यात आली.यावेळी महालोकअदालतीमध्ये प्रथम तडजोड झालेल्या दिवाणी प्रकरणातील पक्षकार व त्यांचे विधीज्ञांचा दिवाणी न्यायाधीशांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.या महोलाकअदालतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडीया,महाराष्ट्र ग्रामीण बँक,व महिंद्रा होम फायनान्स यांची एकूण ९० वादपूर्व प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती.त्यापैकी २१ प्रकरणात तडजोड होवून रक्कम रुपये ८,३१,७०४ एवढी रक्कम कर्जदाराकडून वसूल करण्यात आली.अशाप्रकारे दाखल प्रकरणे व वादपूर्व प्रकरणात निकालीअंती एकूण रक्कम रुपये ९,७०,२०९ संबंधीतांकडून वसूल करण्यात आल्याची माहीती विधी सेवा समितीच्या वतीने देण्यात आली.या महालोकअदालतीकरिता पॅनल विधीज्ञ म्हणून अँड.डी.टी.यादव व अँड.ए.पी.तिरमले यांनी काम पाहिले.

COMMENTS