नांदेड.(प्रतिनिधी) अज्ञात चोरटयांनी एका महिला डॉक्टरच्या घरासमोरील कार चोरून नेली. ही घटना नऊ ऑगस्टच्या मध्यरात्री ते १० ऑगस्ट रोजी पहाटे पाचवाजेच्यादरम्यान, नांदेड ते हैद्राबाद रस्त्यावरील तुप्पा शिवारातील 'चंदासिंघ' कॉर्नर परिसरात घडली आहे.
नांदेड ते हैद्राबाद रस्त्यावरील तुप्पा शिवारातील 'चंदासिंघ' कॉर्नर भागातील रहिवासी डॉ. संतोषी विक्रांत गायकवाड या त्यांच्या मालकीची एमएच-२६, एके- ५१५१ ही कार नेहमीप्रमाणेच उपरोक्त घरासमोर म्हणजे, डॉ. गायकवाड यांच्या हॉस्पिटलच्यासमोर उभी केली होती. दरम्यान, अज्ञात चोरटयांनी संधी साधून ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक ते १० ऑगस्ट रोजी पहाटे पाचवाजेदरम्यान, उपरोल्लेखित ठिकाणी उभी केलेली कार चोरून नेली. चोरीला गेलेल्या कारची किंमत डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीच्याआधारे १ लाख २० हजार नोंदविण्यात आली असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस पो. कॉ. जनार्दन महाले यांनी दिली आहे.
याप्रकरणी डॉ. संतोषी विक्रांत गायकवाड यांच्या तक्रारीचेआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रभाकर मलदोडे व त्यांचे अन्य सहकारी कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. विशेष बाब म्हणजे, या घटनेमुळे वाहन मालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

COMMENTS